खासदार भास्करराव भगरे यांच्या पुढाकाराने गुणवंत युवकांचा भव्य सत्कार



प्रतिनिधी  :गणेश ठाकरे लासलगाव 

 दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे यांच्या पुढाकाराने इंडियन आर्मी, पोलीस भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या परिसरातील गुणवंत युवक-युवतींचा भव्य सत्कार सोहळा रविवारी उत्साहात संपन्न झाला.

खासदार भास्करराव भगरे यांच्या भास्कर जनसुविधा कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व प्रेरणादायी साहित्य देऊन गौरव करण्यात आला. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यशाचे शिखर गाठणाऱ्या युवक-युवतींच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा तसेच त्यांच्या यशातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सातत्यपूर्ण प्रयत्न, शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असे प्रतिपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांनीही आपल्या यशाचा प्रवास उपस्थितांसमोर मांडत स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेची तयारी करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते भास्करनाना बनकर, शिवाजीराजे निरगुडे, हर्षल जाधव, रामराव बनकर सर, एम. आर. जाधव सर, समीर जाधव सर, डोखळे सर, सुनील शेट्टी, सुनील पेलमहाले, गणेश महाले सर तसेच पत्रकार लक्ष्मण महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळ्यामुळे परिसरातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती व संरक्षण दलातील करिअरबाबत प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



No comments:

Post a Comment