प्रभारी समादेशक अधिकारी कार्यालय मुर्तिजापूर होमगार्ड पथका कडुन पोलिस उपनिरीक्षक राजुभाऊ वानखडे यांचा सत्कार,




 प्रतिनिधी गजानन चव्हाण 

पोलिस ‌उपनिरीक्षक  राजुभाऊ वानखडे यांचा आज रविवार दि 19/04/2026  रोजी मुर्तिजापूर शहर पोलिस स्टेशन येथे प्रभारी समादेशक कार्यालय मुर्तिजापूर होमगार्ड पथका कडून सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता,या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी समादेशक अधिकारी, कंपनी नायक, अँड.दिलीप नाईक .तर प्रमुख अतिथी पलटण नायक संतोष महल्ले,प.ना. महादेव नेमाडे ,प. ना.राहुल तोडकर , कंपनी सार्जेंट मेजर गजानन चव्हाण, सार्जेंट अमोल सिरसाट सार्जेंट अक्षय चिकणे,कार्यालयाचे किशन रुमाले आदी हे होते,अँड. नाईक सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अतिशय प्रामाणिक, दिलदार व हुशार व्यक्तीमत्व यांचा  सत्कार करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे व सर हे आमच्या शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून यावे ही अपेक्षा करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच वानखडे सरांनी  आपल्या भाषणात माझा मूर्तिजापूर होमगार्ड पथकाशी खूप जुना संबंध असून या पाथकातील सर्वाशी माझी अतिशय प्रेमाची नाड जुडली आहे, इथला प्रत्येक व्यक्ती माझा मनाशी जुडलेला असून माझा इथे सत्कार होणे माझ्या साठी खूप मोठी बाब आहे, मी आपले प्रेम कधीही विसरू शकणार नाही असे भावनिक उदगार काढले, त्यांनी आपली सेवा मुर्तिजापूर,अकोला, पिंजर पोलीस स्टेशन मध्ये सेवा देत आता माना पोलीस स्टेशन येथुन मुर्तिजापूर शहर पोलिस स्टेशन येथे ते पोलिस उपनिरीक्षक म्हणुन  बदलीवर आले आहेत, ते सर्व ईकडे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ‌म्हणुन ते परिचित आहेत .त्यांच्या या मनमिळावू स्वभावाने  ते सर्वांचे आवडते आहेत,बरेच वर्षा नंतर मूर्तिजापूर मधून बदली होऊन पुन्हा मूर्तिजापूरला बदली झाली व आजही आपल्या माणसावर एवढे प्रेम असणारे अधिकार असणे खूप कौतुकाची बाब आहे,खाकी वर्दी मधील आपला माणूस म्हणून त्यांची ओळख आहे,या अगोदर नेहरु युवा बहुउद्देशीय व सांस्कृतिक मंडळ कोकणवाडी, श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था सालतवाडा, साईराज मित्र मंडळ स्टेशन विभाग मुर्तिजापूर,कैसा करते ग्रुप,मूर्तिजापूर स्वछता अभियान मूर्तिजापूर यांच्या वतीने  त्यांचा सत्कार केला आहे, आज  मूर्तिजापूर पथकातील महिला, पुरुष अधिकारी होमगार्ड सैनिक यांच्या कडून त्यांना शॉल, श्रीफळ, देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार गजानन चव्हाण यांनी केले, तर 

 या कार्यक्रमासाठी मूर्तिजापूर पथकातील सर्व अधिकारी,पुरुष  व महिला होमगार्ड सैनिक हजर होते..


No comments:

Post a Comment