५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात!
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांनी एका मोठी कारवाई करत जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथील महसूल सहाय्यक (वर्ग-३) श्री. नरेश साधूरामजी बर्वे (वय ५४ वर्षे) यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.
तक्रारदार (वय ४६ वर्षे) यांचे शिवाजीनगर, महाल, नागपूर येथील ११३५ चौरस फूट प्लॉटवरील बांधकामासंदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय (स्लम) येथे अपील दाखल होती. हे प्रकरण तक्रारदाराच्या बाजूने निकाली काढण्यासाठी आरोपी लोकसेवक श्री. नरेश साधूरामजी बर्वे यांनी ५ लाख रुपयांची मागणी केली असल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची दि. १७/०४/२०२६ व दि. २०/०४/२०२६ रोजी पडताळणी केली असता आरोपीने लोकसेवकाने तक्रारदाराला काम करून देण्याच्या मोबदल्यात ५ लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार यातील आरोपीने लोकसेवकाने तक्रारदारास लाचेची रक्कम घेऊन आपल्या राहत्या घराच्या (न्यू नंदनवन लेआउट) जवळ दिनांक २४/०४/२०२६ रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास बोलावले होते.
त्याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक २४/०४/२०२६ रोजी रचलेल्या सापळ्यात आरोपी लोकसेवक श्री. नरेश बर्वे यांनी पंचासमक्ष ५ लाख रुपये स्वीकारल्याने त्यांना जागीच ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपी लोकसेवका जवळुन ५ लाख रुपयांची लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी नंदनवन पोलीस स्टेशन, नागपूर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर यशस्वी सापळा कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर चे पोलीस अधीक्षक डॉ. श्री. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बाविस्कर व श्री. विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक श्रीमती भारती गुरनुले, पोनी विवेक पडघन, पोहवा. विलीन तांबडे, पोहवा. भरत ठाकुर, मपोअं स्वाती हिंडोरिया, मपोअं दिपाली भगत, पोशी विकेश राउत आणि मपोअं हर्षलता भरडकर सर्व नेमणुक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांनी पार पाडली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तर्फे जनतेला आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणात्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्यांच्या विरुध्द निर्भयपणे पुढे येऊन तक्रार नोंदवावी.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे खालील क्रमांकावर संपर्क साधावा
१. पोलीस अधीक्षक कार्यालय दुरध्वणी क्र. 0712-2561520,
२. टोल फ्री क्रमांक : 1064 / व्हॉटसअॅप क्र. 9067671064

No comments:
Post a Comment