डोंगरकडा स्वयंभू श्री जटाशंकर मंदिरात दानपेटी फोडून रक्कम पळविली



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील स्वयंभू श्री जटाशंकर मंदिरातील दानपेटी फोडून सीसीटीव्ही चे डिव्हाईस दरोडेखोरांनी चोरून नेल्याची घटना काल रात्री २३ एप्रिल रोजी घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोंगरकडा येथील स्वयंभू श्री जटाशंकर मंदिर हे सर्वदूर प्रसिद्ध देवस्थान म्हणुन परिचित आहे, या देवस्थाला शासनाचा 'क' दर्जाचा पर्यटन स्थळ दर्जा प्राप्त आहे येथील स्वयंभू श्री जटाशंकराची मूर्ती ही प्राचीन दुर्मिळ असल्याने येथे भाविकांची नेहमीच रेलचेल असते. या ठिकाणी परिसरातील विवाह सोहळे मोठ्या प्रमाणावर होतात. सदरील देवस्थाला ट्रस्टी, विश्वस्थ कारभार पाहतात

सीसीटीव्हीचे डिव्हाईस सुध्दा चोरट्यांनी सोबत नेले

त्यामुळे देवस्थानच्या अधिकृत क्लार्क कडून सदरील चोरीची घटना लक्षात आल्यावर त्यांनी ट्रस्टी देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब अडकीने यांच्या कानावर घातलीअसता त्यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देऊन झालेवर ठाणेदार विष्णुकांत गुठ्ठे यांनी सदरील चोरीच्या ठिकाणि फिंगरप्रिंट एक्स्पर्ट ला पाचारण केले असता पुढील तपास पोलीस करत आहेत. सदरील घटनेत 'कटर' चा वापर केला असून गुन्हेगार हे पोहचलेले दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment