तेलंगणा येथे महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळा ची विटंबना प्रकरणी, आम्ही भारतीय लोक, वंचित बहुजन आघाडी शेतकरी संघटना (माढा तालुका) वतीने संयुक्त धरणे आंदोलन!
प्रतिनिधी -वैशाली बाबासाहेब ढगे
तेलंगणा राज्यात तेल्लापूर गावात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली सदर घटना चा बहुजन समाज कडून निषेध व्यक्त करण्यात आला. जोतिराव फुले यांच्या पुतळाला अभिवादन करून धरणे आंदोलन ची सुरवात करण्यात आली.तेलंगणा राज्य सरकार, भाजप आणि काँग्रेसचा निषेध वेक्त करण्यात आला.
छत्रपती शाहू महाराज,जोतिराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचा जयजयकार घोषणा देण्यात आल्या,जोतिराव फुले यांचा अपमान करणाऱ्या लोकांवर, योग्य कायदेशीर सह अट्रॉसिटी कायद्याने गुन्हा दाखल करावा ही मागणी करण्यात आली!
देशात फुले आंबेडकर विचाराधारा ची सरकार येईल हा आशावाद धरणे आंदोलन मधील कार्यकर्तेनी मांडला.धरणे आंदोलन मध्ये उपस्थित पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडी चे दत्तात्रय जाधव हरिदास शिवाजी ढगे, ( सामाजिक कार्यकर्ते ) ,विजय श्रीमंत पवार, गणेश भारत खुळे, गुरुदेव बाबुराव लोंढे ,प्रताप उत्तम पिसाळ (शेतकरी कामगार पक्ष) ,नवनाथ भगवान खटके , याकुब मुलांनी ,(राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा) जब्बार शेख (एम आय एम अध्यक्ष ),रामहरी पाटील , ऍड.तुकाराम राऊत, व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. धरणे आंदोलन चे आभार हनुमंत पाटील यांनी मानले.
दिनांक 13 फेब्रुवारी 2026, रोजी तहसील कार्यालय समोर माढा ,.. माढा पोलीस ठाणे यांचा पोलीस बंदोबस्त तैनात होता,
धरणे आंदोलन शांततेत करण्यात आले.

No comments:
Post a Comment