चास (नळी) येथे रानवारा फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या कांदा चाळ प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न.



पत्रकार:- मोहन जाधव.


चास (नळी):- रानवारा फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कांदा चाळ (१०००मीटर शेड) प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पडला. हा प्रकल्प माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत आहे. या समारंभाचे अध्यक्ष साईनाथ गाडे व त्यांच्या पत्नी माधुरी गाडे यांच्या हस्ते पूजा विधी, होम व कुदळी मारून भूमिपूजन करण्यात आले. तसेच गावातील प्रतिष्ठित शेतकरी उद्योजक व संचालक मंडळ यांच्या हस्ते नारळ अर्पण करून कार्यक्रम संपन्न झाला. या प्रोड्यूसर कंपनीच्या स्थापनेत अध्यक्ष साईनाथ गाडे यांच्यासह संचालक ज्ञानेश्वर शिंदे, संजय चांदगुडे, विनायक गाडे, शिवाजी सोमवंशी व संचालिका अनिता चांदगुडे यांचा महत्वाचा सहभाग होता. सदर बांधकामाचे काम १२० दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असे बांधकाम कंत्राटदारांनी सांगितले. या ग्रामीण भागातील प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असून चास नळी गाव व परिसरातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच, प्रतिष्ठित शेतकरी, कारखाना संचालक मंडळ तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment