देवगांव विद्यालयात ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ प्रदर्शन उत्साहात



  मोबाइल म्युझियम बसमुळे विद्यार्थ्यांनी अनुभवला शिवकालीन इतिहासाचा जिवंत अनुभव विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी न्यूनगंड न बाळगता सातत्यपूर्ण अभ्यास करावा - तहसीलदार नाईकवाडे

प्रतिनिधी = . गणेश ठाकरे लासलगाव 

   यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढू लागला आहे. स्पर्धा परीक्षांचे ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता सातत्यपूर्ण अभ्यास करण्याचे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले.

    पुरातत्त्व विभाग व वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ हे शिवकालीन शस्त्रांचे फिरते प्रदर्शन देवगांव येथील अभिनव बालविकास मंदिर व श्री. डी. आर.भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केले होते. याप्रसंगी तहसीलदार नाईकवाडे बोलत होते. यावेळी त्यांनी शिवशस्त्रशौर्यगाथा प्रदर्शनातून छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती लक्षात येत असून प्रदर्शनातील केवळ शस्त्रे नाहीत, तर तो एक सजीव वारसा आहे. महाराजांचा देदीप्यमान इतिहासातून युवा पिढीने प्रेरणा व आदर्श घेऊन कार्यरत राहण्याचे आवाहन केले.

प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार विशाल नाईकवाडे, भूमी अभिलेख उपअधीक्षक राजेंद्र भाबड यांच्या हस्ते झाले. यावेळी लासलगाव बाजार समितीचे संचालक डॉ.श्रीकांत आवारे, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे, माजी सरपंच विनोद जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजीराम खुळे, सचिन बोचरे, राजेंद्र मेमाणे, मनोहर बोचरे, धनंजय जोशी, उपसरपंच लहानू मेमाणे, राजाराम मेमाणे, मुख्याध्यापक के. एम. गाजरे, अभिनव शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सुदर्शन जाधव, पोलीस पाटील सुनिल बोचरे, आबुभाई काद्री, भागवत बोचरे, शरद लोहकरे आदि उपस्थित होते.

    प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील विविध शस्त्रांचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले होते. यात दांडपट्टा, ढाली, तलवारी, बर्चे, भाले, वाघनखे धनुष्य-बाण आदी ऐतिहासिक शस्त्रांचा समावेश होता. या शस्त्रांची फलकांच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली होती.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक आहेर यांनी मानले.

No comments:

Post a Comment